व्हीएसआरएस मराठी न्युज -बीआरटी’ मार्गांवर खासगी वाहणांची घुसखोरी रोखण्यासाठी मार्गांच्या सुरवातीला सुरक्षारक्षक असायचे पण बऱ्याच वेळा खासगी वाहणचालक या सुरक्षारक्षकाला न जुमानता आपले वाहन घेऊन जायचे.
या खासगी वाहणामुळे “बीआरटी’ मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. तसेच, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. या समस्या रोखण्यासाठी “पीएमपीएमएल’ प्रशासनाने “बीआरटी’ मार्गावर अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण चार ठिकाणी प्रायोगिक तत्वावर “बूम बॅरिअर’ बसवण्याचे नियोजन केले आहे. त्यातील दोन ठिकाणी स्वयंचलीत फाटक बसवले आहे. त्यापैकी पिंपरीतील जगताप डेअरी चौकातील बुम बॅरिअरची नुकतीच चाचणी यशस्वी झाली आहे. तर दुसरी चाचणी पुण्यातील डेक्कन कॉलेज चौकात घेण्यात येणार आहे.
पिंपरीतील जगताप डेअरी चौकात बसवलेल्या “बुम बॅरिअर’ व्यवस्थितरित्या काम करते की नाही हे पाहण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. यावेळी सर्वप्रथम या मार्गांवरून “पीएमपीएमएल’ची बस घेऊन जाण्याचा प्रयत्नं करण्यात आला. त्यावेळी हे “बुम बॅरिअर’ उघडले. त्यानंतर काही खासगी वाहने या मार्गावरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र खासगी वाहन आले तरी हे “बुम बॅरिअर’ उघडले नाही. त्यामुळे हे “बुम बॅरिअर’ यशस्वीरित्या काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी मत नोंदवले. तसेच, इतर ठिकाणची चाचणी यशस्वी झाल्यास ही यंत्रणा शहरातील सर्व “बीआरटी’ मार्गांवर बसवणार असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.
Discussion about this post