व्हीएसआरएस मराठी न्युज -पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधी दरम्यान होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत या तारखांची शिफारस केली गेली आहे.
दरम्यान, 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक होणार असल्याने विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
आगामी पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार असून 17 दिवस होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र, उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीनेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यंदाचे पावसाळी अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एकजुटीने सरकारला घेरण्याच्या तयारीत असणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या वाढत्या किमतींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post