व्हीएसआरएस मराठी न्युज –तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुमारे १२५ कोटी रुपये खर्चाचे उभारण्यात येत असलेले जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिरासंदर्भात श्री विठ्ठल-रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या विश्वस्तांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेऊन चर्चा केली.
तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद-पाटील, पंकज गावडे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. त्यांनी रविवारी (ता. २३) सकाळी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुमारे १२५ कोटींचे उभारण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिरासंदर्भात माहिती दिली. मंदिराच्या कामाची पार्श्वभूमी विलास लांडे यांनी सांगितली. बाळासाहेब काशीद यांनी मंदिराचे स्वरूप आणि चालू असलेल्या कामाची माहिती देऊन पवार यांनी मंदिराची माहिती दिली.
Discussion about this post