व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरीचिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला अखेर शहराध्यक्ष मिळाला असून, बहुप्रतिक्षीत असलेल्या पदावर माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पद रिक्त होते. त्याजागी माजी आमदार विलास लांडे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे आणि काशिनाथ जगताप यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, शरद पवार गटाकडून युवा चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्यांनी नियुक्तीपत्र घेतले. यावेळी आमदार रोहीत पवार, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.
Discussion about this post