व्हीएसआरएस मराठी न्युज (आक्रम शेख) प्रतिनिधी-पिंपरी : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विश्वंभर गाथाडे यांचे नुकतेच दु खद निधन झाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देवुन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.
यावेळी विश्वंभर गाथाडे यांचा मुलगा किशोर गाथाडे यांच्यासह घरातील लाेकांची विचारपुस केली. विश्वंभर शंकर गाथाडे ह्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा पिंपरी चिंचवड शहरात सर्वात पहिली सुरू केली होती सामाजिक क्षेत्रात गाथाडे परिवार तीस ते पस्तीस वर्षे कार्यरत असून नागरिकांना वेळोवेळी मदत ह्या संघटनेच्या माध्यमातून केली.
Discussion about this post