व्हीएसआरएस मराठी न्युज –कु,दळवाडी परिसरात लसीकरण केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र महानगरपालिका आरक्षित जागेवर सुरू करावे,स्वी सदस्य दिनेश यादव यांची मागणी.
मुंबई शहरामध्ये गोवर या आजाराच्या रुग्णांच्या संख्या वाढ चालली आहे. माझ्या कुदळवाडी या परीसरामध्ये मोठी कामगार वसाहत आहे. तसेच लोकसंख्या देखील जास्त आहे. या भागामधून ट्रान्सपोर्ट संबंधित वाहनांच्या मुंबई या शहरामध्ये ये-जा चालू असते. मुंबई शहरातमधून या भागात येणा-या नागरिकांकडून गोवर या आजाराचा प्रसार भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवर आजाराचे पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कुदळवाडी येथे रिगल रेसीडेन्सी जवळ महानगरपालिकेच्या मोकळया जागेमध्ये गोवर आजारा संबंधातील लसीकरण सुरु करावे तसेच आरोग्य केंद्र सुरु करावे.
अशी मागणी स्वी सदस्य दिनेश लालचंद यादव यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ श्री पवन साळवे यांच्या कडे केली आहे.
Discussion about this post