व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)आळंदी:-दि.१५ आळंदी येथे २१ जूनला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा होणार असून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान,पोलीस प्रशासन व आळंदी नगरपरिषद प्रशासन ह्या सोहळ्यास सज्ज होताना दिसत आहे.श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने नदी पलीकडील घाटावर व भक्ती सोपान पुलावर भाविक वारकरी यांच्या साठी दर्शनबारी,रांगेचे चे काम सुरू असल्याचे दिसत आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिक ठिकाणी चौकात पोलिस मदत केंद्र उभारण्याचे काम चालू आहे.
नगरपरिषद प्रशासन यांच्या वतीने
विविध ठिकाणी भाविकांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करत असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मी माता चौकातील फुटपाथ वरील खड्डा बुजवून फुटपाथ दुरुस्ती चे काम करत असल्याचे ही दिसून येत आहे.
आज पुन्हा आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित पाण्याने फेसाळलेली दिसून आली.आषाढी वारी मोजक्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे.महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठया वाहनातून काही भाविक आल्याचे चित्र दिसून येत आहे.अलंकापुरीत विविध ठिकाणाहून दिंड्या वारकरी प्रस्थान सोहळ्या निमित्त दाखल होणार आहेत.
Discussion about this post