व्हीएसआरएस मराठी न्युज –लोणावळा येथील कल्पतरू हॉस्पिटल मध्ये डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डी पी यु आय व्ही एफ आणि एन्डोस्कोपी सेंटरच्यावतीने वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन येत्या गुरुवार दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १:३० ते ४:३० वा करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मार्गदर्शन वंध्यत्वरोग तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल.
वंध्यत्वाने ग्रस्त महिला व पुरुष यांनी वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबीर कल्पतरू हॉस्पिटल वर्धमान सोसायटी, लोणावळा पोलीस स्टेशन जवळ, लोणावळा, पुणे येथे होत आहे.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरिता संपर्क क्र. ८८८८८४४८३१ वर संवाद साधू शकता.
Discussion about this post