व्हीएसआरएस मराठी न्युज -चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निवासस्थानी अजितदादा भेट दिली; त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच त्यांच्या पत्नी, विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची व कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि बाळूभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.
जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे, प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे खासदार बाळू धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते.
त्यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. नुकतेच त्यांचे पितृछत्र हरपले होते, हे दुःख खूप मोठे आहे. या धक्क्यातून कुटुंबीय सावरत असतानाच बाळू धानोरकर यांनी इहलोक सोडून जाणे, हा कुटुंबीयांसह, कार्यकत्यांकरिता त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
Discussion about this post