मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
मुंबईतील पवई भागात भीषण अग्नितांडव घडले आहे. साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागली आहे. या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर, शोरुम जवळच्या महावीर क्लासिक इमारतीतील नागरिकांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे.
आग इतकी मोठी आहे की परिसरात धुरांचे मोठे लोट पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळं सेंटरच्या बाजूलाच असलेल्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. तसंच, आगीच्या ठिकाणावरुन स्फोटाचे मोठे आवाज येत आहेत. तर, आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्याअसून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Discussion about this post