व्हीएसआरएस न्युज पिंपरी खराळवाडीतील पक्ष कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अनेक नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांना भेटून आपल्या विविध समस्या मांडल्या.
स्वीय सहाय्यकांनी सर्व नागरिकांचे अर्ज व निवेदने स्वीकारून त्यांना उचित मार्गदर्शन केले. अनेकांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वस्त देखील केले. दरम्यान, शासनदरबारी रखडणारी अनेक कामे मुंबईला न जाताच जलदगतीने होत असल्याने सर्व नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अजितदादांच्या स्वीय सहाय्यकांचे स्वागत केले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, नगरसेविका डॉ.वैशाली घोडेकर, राहुल भोसले,विनोद नढे , फझल शेख, आदी उपस्थित होते.
Discussion about this post