व्हीएसआरएस न्युज पिंपरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची २०२१ ते २०२३ या दोन वर्षांसाठी पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली आहे. जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून संजय बारी यांची निवड झाली असून, जिल्हा सचिवपदी सम्यक वि. म. आणि प्रमोद बचुटे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हा कार्यकारिणीत अन्य विभागाच्याही निवडी बहुमताने करण्यात आल्या. वैज्ञानिक जाणिवा विभाग कार्यवाह अरुणा यशवंते, सहकार्यवाह राजकुमार माळी, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह राजकुमार भंडे, सहकार्यवाह रामदास शिवेकर, महिला व युवा विभाग कार्यवाह पल्लवी सवाखंडे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह महेश घाडगे, सांस्कृतिक विभाग कार्यवाह केशव कुदळे, सोशल मीडिया विभाग कार्यवाह रविराज थोरात, कायदे विभाग कार्यवाह सचिन माने, निधी व्यवस्थापन विभाग एकनाथ पाठक यांची निवड झाली आहे.
Discussion about this post