व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नवा फंडा वापरला आहे. थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोलिसांशी संवाद साधत पसंतीक्रम जाणून घेत 124 पोलीस कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या.
अंतर्गत बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांच्या सोबत मिळून थेट पोलीस कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसह ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचा संबंधित पोलीस ठाण्याचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, अशा अकरा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार खटाळ (दिघी ते हिंजवडी), उद्धव खाडे (हिंजवडी ते शिरगाव), शाहिद पठाण (देहूरोड ते वाहतूक विभाग), पोलीस उपनिरीक्षक विद्या माने (दिघी ते आळंदी), विशाल दांडगे (चाकण ते भोसरी), दत्तात्रय मोरे (देहूरोड ते पिंपरी), अमरदीप पुजारी (एमआयडीसी भोसरी ते चिखली), बापू जोंधळे (आळंदी ते दिघी), विनोद शेंडकर (सांगवी ते चाकण), सचिन देशमुख (चिखली ते एमआयडीसी भोसरी), नंदराज गभाले (हिंजवडी ते दिघी)
Discussion about this post