व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील महिला वर्गास प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजने अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण व पक्के ड्रायव्हिंग लायसन्स देणेबाबत शिबिराचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या योजनेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील २५ ते ४५ वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेकरीता आजपर्यंत साधारणत: एक ते डिड हजार महिलांनी अर्ज केले असून या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. तरी या योजनेसाठी जास्तीत जास्त शहरातील महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
Discussion about this post