व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –महापालिकेने या पूर्वीच शहरात पे अॅन्ड पार्क योजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र, पे अॅन्ड पार्कच्या ठिकाणी वाहने उभी न करता नागरिक कुठेही बेशिस्तपणे वाहने उभी करीत असल्याचे दिसून आले. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी पोलिसांना केली.
मात्र, कारवाईसाठी आमच्याकडे टोईंग व्हॅन नसल्याचे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. यामुळे महापालिकेने कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना टोईंग व्हॅन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली.
बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी तसेच पे अॅन्ड पार्कला बळकटी यावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना पाच टोइंग व्हॅन दिल्या.
या कारवायांमधून काही रक्कम महापालिकेला देण्याचा निर्णय झाला. गेल्या सहा महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत 55 लाख 77 हजार 394 रुपये जमा झाले आहेत.
Discussion about this post