व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन जिज्ञासा वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सोमवार 1 नोव्हेंबर आणि मंगळवार 2 नोव्हेंबर रोजी रोबोट विषयावरती कार्यशाळा होणार आहे. त्याबाबत नंदकुमार कासार, शिक्षण अधिकारी, सायन्स पार्क म्हणाले की रोबोट वरील कार्यशाळेत टायनी बॉट्स ही संस्था रोबोट विषयी प्राथमिक माहिती देणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना किंवा मुला मुलींना रोबोट्स बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची किट्स देणार आहे. त्याचा उपयोग करून ते रोबोट बनवतील. ही कार्यशाळा सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल.
तसेच गमतीशीर विज्ञान गणितावर आधारित कार्यशाळा दोन बॅचेस मध्ये सोमवार 1 नोव्हेंबर ते मंगळवार 2 नोव्हेंबर 2022 व गुरुवार 4 नोव्हेंबर ते शुक्रवार 5 नोव्हेंबर 2022 रोजी साहित्य मूल्य नोंदणी सह संपन्न होणार आहेत.
Discussion about this post