व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय यातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला.
हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.
एकूण ३६ प्राणी मृत्युमुखी पडले
दरम्यान, २०१७ ते सन २०२३ या कालावधीत एकूण ३६ प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथीलशासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. ३६ प्राण्यांचा मृत्यू हीगंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणीसंग्रहालय हस्तांतरित करण्याचे निर्देशदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला
Discussion about this post