व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी दि. २०. – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहराचे योग्य नियोजन करण्यासाठी पथ विक्रेत्यांसाठी आठही क्षत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत चांगल्या हॉकर झोन ची निर्मिती लवकरच करणार अशी घोषणा आज शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत आज केली.
महापालिका सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खराटे, सहा आयुक्त प्रताप सरनाईक ,शहर फेरीवाला समितीचे सदस्य तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, क्षत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, सिताराम बहुरे, अण्णा, बोदडे, शितल वाकडे , राजेश आगळे,अमित पंडित,सदस्य प्रल्हाद कांबळे, राजेंद्र वाकचौरे, डॉ.सरोज अंबिके, अँड बी.के. कांबळे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून पथ विक्रेत्यावर अन्यायकारक कारवाई करण्यात येते होती हि कारवाई थांबवण्यात यावी व कायदेशीर हक्काची जागा देण्यात यावी व फेरीवाला कायद्याचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे त्या सुनावणीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आता कामकाज सुरू केले असून आज बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आठही प्रभागांमध्ये काही जागा हॉकर झोनसाठी सुचवल्या व त्यावर चर्चा झाली. यावेळी नखाते म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये जागा निवडत असताना आम्ही अनेक जागा सुचवू त्या जागेवरती सकारात्मक विचार व्हावा कारण फेरीवाला संघटनेला विश्वासात घेऊन नियोजन केल्यास चांगल्या पद्धतीने झोन निर्मिती होईल अन्यथा जागा ओस पडतील . तसेच झोनच्या ठिकाणी वीज, पाणी स्वच्छतागृह देण्यात यावे तसेच फेरीवाला शुल्क आकारणीबाबत ही कमीत कमी असावी. तसेच बोगस सर्वेक्षण रद्द करून प्रामाणिक विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली
Discussion about this post