व्हीएसआरएस मराठी न्युज -चिंचवड आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधन झाले. या दु:खातून जगताप कुटुंबीय आणि त्यांचे सर्वपक्षीय हितचिंतक अद्याप सावरलेले नाही.
अल्पावधीत लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जगताप कुटुंबीयांसोबत राहीले पाहिजे. ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
भूमिपूत्र म्हणून स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहरात गेले ३५ वर्षे राजकारण-समाजकारणात योगदान दिले. पक्षीय जोडे बाजुला ठेवून आपल्यासारख्या कार्यकर्त्याला वेळोवेळी ताकद आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी ठेवली. त्यामुळे तुमच्या-माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले. सर्वपक्षीय नेत्यांशी तसेच केंद्र आणि राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळेच लक्ष्मणभाऊ पिंपरी-चिंचवडचे लोकनेते होते. तसेच, लक्ष्मणभाऊंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदतीमुळेच तुमच्या-माझ्यासारखे कार्यकर्ते घडले. अनेकांना महापालिका आणि पक्षांच्या माध्यमातून विविध महत्वाच्या पदांवर आपल्याला संधी मिळाली. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जगताप यांच्या मदतीमुळेच शक्य झाले. हे आपल्याला विसरुन चालणार नाही, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वतीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबतची पत्राद्वारे विनंती केल्यानंतर गव्हाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जगताप यांना वेळोवेळी मदत केली होती. नगरसेवक, महापौर, आमदार बनविण्यामध्ये राष्ट्रवादीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे सर्वांनाच माहित आहे. जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक होत आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटूंबाबद्दल मला व माझ्या पक्षाच्या प्रत्येकाला आदर आहे. त्यामध्ये कोणतेच दुमत नाही. भाजपने यापूर्वी पोटनिवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यामुळे जगताप कुटुंबियांचा आदर कायम ठेवत निवडणूक लढविण्याची भूमिका स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेली आहे. शहराध्यक्ष म्हणून महेश लांडगे यांनी घेतलेली भूमिका देखील स्वागतार्ह आहे. परंतू वरीष्ठ पातळीवरील नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचेही गव्हाणे यांनी या पत्रात म्हटले आहे.
Discussion about this post