Pimpri News : पिंपरी : झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या उद्योगसमूहावर आयकर विभागाने दि. ६ डिसेंबर रोजी छापे घातले. या छाप्यांमध्ये बेहिशेबी शेकडो कोटी रुपये सापडले होते. खासदार साहू यांच्याविरोधात आज दि. ११ डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ही निदर्शने झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत खासदार साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
आंदोलनामध्ये महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, प्रदेश सचिव कविता हिंगे, वैशाली खाडये, माजी नगरसेवक सागर अंघोळकर, संतोष तापकीर, सतीश नागरगोजे, देवदत्त लांडे, मनोज ब्राम्हणकर, नंदू कदम, बाळासाहेब भुंबे, मुकेश पुडासमा, दिपक भंडारी, बाळासाहेब भुंबे, विजय शिनकर, अलका मकवाना, दिपाली तारसकर, मंगल आढाव, लक्ष्मी काची, जयश्री मकवाना, कोमल शिंदे, दिपाली कलापुरे, विद्या माळी, जयश्री वाघमारे, रेखा काटे, दिपाली केंगारे, विजयश्री नन्नावरे, रोहीणी रासकर निलम दळवी, पल्लवी पाठक, कमलेश बाहरवाल, निता कुशारे, अंजली पांडे, चेतना मुंदाणकर, श्रीमती मिनल आदी उपस्थित होते.
Discussion about this post