Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे येथे दोन दिवसांपूर्वी स्पार्कल्स तयार करणा-या कारखान्यात स्फोट होऊन ६ महिलांचा मृत्यू झाला होता. तर १० जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून पाठविण्यात आलेल्या १० रुग्णांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित रुग्णांच्या फुफ्फुसांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्यामुळे सर्वच रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
Discussion about this post