Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सैनिक स्कूल अकॅडमीची सहल देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे गेली असता तेथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या चार विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे. ही दुर्घटना दि. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. हे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथे असलेल्या संकल्प सैनिकी स्कूल अकॅडमीचे ३५ विद्यार्थी सहलीसाठी देवगड येथे गेले होते. हे विद्यार्थी सायंकाळी समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील ५ विद्यार्थी बुडाले. त्यापैकी ४ विद्यार्थिनींचे मृतदेह सापडले आहेत. एक विद्यार्थी बेपत्ता आहे.
अंकिता गालटे, अनिशा पडवळ, प्रेरणा डोंगरे आणि पायल बनसोडे अशी मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. तर राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.
विद्यार्थिनींचे मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
Discussion about this post