व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी – पिंपरी-चिंचवड मा नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या सहकार्यातून बालदिनानिमित्त उद्या (सोमवारी) बालजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये खाऊगल्लीचे विशेष आकर्षण असून मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सुद्धा घेतले जाणार आहेत, अशी माहिती कुटे यांनी दिली.
दत्वाडी आकुर्डी ट्रिनेटी शाळा शेजारी सोमवारी दुपारी 5 ते रात्री 10. या वेळेत बालजत्रा भरणार आहे. त्याचबरोबर दिवाजिनिमित्त घेण्यात आलेल्या भव्य गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.
प्रमोद कुटे म्हणाले की, “भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना आनंद लुटण्यासाठी बालजत्रेचे आयोजन केले आहे. लहान मुलांसाठी खाऊगल्ली, मनोरजंनाचे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, आकुर्डी परिसरातील पालक, बालकांनी जत्रेत सहभागी व्हावे, जत्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन कुटे यांनी केले आहे.
Discussion about this post