व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर रोज हजारो वाहने प्रवास करतात, यात अनेक वाहने ही परराज्यातील तसेच जिल्ह्यातील असतात.
या वाहनचालकांना एक्स्प्रेस-वेचे नियम माहिती नसतात. तर काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून अपघाताला निमंत्रण देत असतात.
वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची मानसिकता बदलविण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या उर्से टोलनाक्यावर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत वाहनचालकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात असून, रस्ता, सुरक्षेविषयी धडे दिले जात आहेत.
नियम तोडून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची आरटीओ अधिकाऱ्यामार्फत दहा गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. अनेक जण परीक्षा पास करतात. विशेष म्हणजे रस्ता, सुरक्षा विषयीच ही परीक्षा असते जेणेकरून वाहनचलकांना नियमांची माहिती व्हावी. समुपदेशन कक्षात घेताच वाहनचालकांना मार्गदर्शन करीत नियम पाळावेत याविषयी प्रबोधन केले जाते. शेवटी, रस्ता, सुरक्षेविषयी शपथ वाहनचालकांना दिली जाते.
Discussion about this post