व्हीएसआरएस मराठी न्युज -राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज धेरगाव येथील निवडणूक कार्यालयात आज मंगळवारी (दि.७) रोजी भरला. यावेळी माजी नगरसेवक अमित गावडे, नवनाथ जगताप आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर राहुल कलाटे म्हणाले, २००९ पासून चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस चालत नाही. त्यामुळेच लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मी सुद्धा मागील वेळेस अपक्ष निवडणूक लढविली होती. अजितदादांना आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहर कळले नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणीही लढायला तयार नव्हते. लोकसभेची लाट आल्यानंतर हे सगळे उमेदवार, जे आता तथाकथित पुढे आले ते सगळे घरी गेले होते. ज्यावेळेस मी निवडणूक लढायची ठरवली, तेव्हा बाकीच्या पक्षांनी आणि संघटनांनी मला त्यावेळी साथ दिली होती.
Discussion about this post