व्हीएसआरएस मराठी न्युज -दिनांक -03 राजगुरू नगर ढाक बंगला येथे लोकमान्य मेडिकल फौंडेशन चिंचवड यु.पी.एस.इंडीया मुंबई व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ” सुरक्षित सारथी सुरक्षित प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न”झाला.
राजगुरू नगर मधील रिक्षा चालक व फोर व्हिलर टु व्हिलर यांच्या साठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला वृंदा गुरवे (मोटार वाहन निरीक्षक) संपत राक्षे ( हुतात्मा राजगुरू रिक्षा संघटना अध्यक्ष ) डॉ विशाल क्षीरसागर (सी .ई .ओ .लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर &रिसर्च सेंटर चिंचवड ) श्रीनिवास पत्तार (संचालक लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर चिंचवड ) सुवर्णा मॅडम ( मोटार वाहन निरक्षक) मंगेश पाचपुते (मोटार वाहन निरिक्षक) अदि मान्यवर उपस्थित होते डॉ .जयंत श्रीखंडे ( आपत्कालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख लोकमान्य हॉस्पिटल ) यांनी उपस्थित नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे मदत केली पाहिजे.
याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव गोळे (जनसंपर्क अधिकारी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड ) यांनी केले सदर कार्यक्रमात एकुण दोनशे जणांनी सहभाग नोंदविला.
Discussion about this post