Pune News : पुणे : पुणे पोलिसांनी २५ मार्च रोजी विशेष मोहीम राबवून दारू पिऊन गाडी चालवणार्या १४२ जणांसह वाहतुकीचे नियम मोडणर्या १५०० चालकांवर कारवाई केली.
एकाच मोटारसायकलवर दोनपेक्षा अधिकजण वाहून नेत असलेल्या २२६ जणांवर तसेच रॅश ड्रायव्हिंग, जोरात हॉर्न वाजवणे, सिग्नल तोडणे आदी अपराध करणार्या ९३३ चालकांवर कारवाई करण्यात आली.अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील,उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Discussion about this post