Pune News : पुणे : आगामी काळात येणारे सण आणि उन्हाळी सुट्ट्या यामुळे रेल्वेप्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन रेल्वेने काही विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्याचे ठरविले असून यामुळे या विशेष गाड्यांच्या ३९० फेर्या वाढणार आहेत. यामुळे रेल्वेने जास्तीतजास्त प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होणार आहे. रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी ही माहिती दिली.
खालील विशेष गाड्यांचा कालावधी मध्य रेल्वे पुणे विभाग वाढवणार आहे
पुणे-छत्रपती शाहूमहाराज टर्मिनस कोल्हापूर दैनिक विशेष
ट्रेन क्र. ०१०२३ पुणे-छत्रपती साहूमहाराज टर्मिनस कोल्हापूर विशेष अधिसूचित ३१ मार्च २०२४ पर्यंत ०१ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ पर्यंत धावण्यासाठी पुढे वाढविण्यात आली आहे. (९१ फेर्या)
ट्रेन क्र. ०१०२४ छत्रपती साहुमहाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे विशेष अधिसूचित ३१ मार्च २०२४ पर्यंत ०१ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ पर्यंत धावण्यासाठी पुढे वाढविण्यात आली आहे. (९१ फेर्या)
पुणे-हरंगुळ दैनिक विशेष
ट्रेन क्रमांक ०१४८७ पुणे-हरंगुल विशेष ३१ मार्च २०२४ पर्यंत अधिसूचित करून ०१ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ पर्यंत धावण्यासाठी पुढे वाढविण्यात आली आहे (९१ फेर्या)
ट्रेन क्र. ०१४८८ हरंगुळ-पुणे स्पेशल ३१ मार्च २०२४ पर्यंत अधिसूचित करण्यात आली आहे.(९१ फेर्या)
लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष
ट्रेन क्र. ०१४३५ सोलापूर-एलटीटी विशेष अधिसूचित २६ मार्च २०२४ पर्यंत ०२.एप्रिल २०२४ ते २५ जून २०२४ पर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे. (१३ फेर्या)
ट्रेन क्रमांक ०१४३६ एलटीटी-सोलापूर विशेष अधिसूचित २७ मार्च २०२४ पर्यंत पुढे ०३ एप्रिल २०२४ ते २६ जून २०२४ पर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आली आहे. (१३ फेर्या)
या गाड्यांच्या वेळा, रचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
गाड्यांच्या तपशीलवार माहितीसाठी,www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
Discussion about this post