Pune News : पुणे : पुण्यातील रामटेकडी, हडपसर, वानवडी परिसरात गुन्हेगारी कृत्यांसाठी कुख्यात असलेल्या शुभम गायकवाड टोळीच्या सदस्यांवर मोक्काखाली कारवाई करण्यात आली आहे.
करण किसन शिंदे वय १९ वर्षे, रा. अंधशाळेचे पाठीमागे रामटेकडी हडपसर पुणे, मुज्जमिल मतीन शेख वय १८ वर्षे रा. आनंदनगर रामटेकडी हडपसर पुणे, ओम राजू भैनवाल वय १८ वर्षे, म्हाडा बिल्डींग रामटेकडी हडपसर पुणे, शुभम राघु गायकवाड वय २४ वर्षे, रा. आनंदनगर रामटेकडी हडपसर पुणे, विशाल रवि जाधव रा. अंधशाळेचे पाठीमागे रामटेकडी हडपसर पुणे अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
२६ जानेवारी रोजी एका कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणार्या एका तरुणाला रामटेकडी, हडपसर परिसरात तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणी वानवडी पोलीसठाण्यात ९७/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३९५,३९२,५०४,५०६, ३४ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल होता.त्यामध्ये या टोळीतील करण शिंदे, मुज्जमिल शेख, ओम भैनवाल यांना अटक करण्यात आली होती. तर तीन अल्पवयीनांनाही ताब्यात घेण्यात आले होते. टोळीप्रमुख शुभम गायकवाड आणि विशाल जाधव हे फरार होते.
शुभम गायकवाड हा आपले टोळीसदस्य आणि अल्पवयीन मुलांकरवी संघटित गुन्हेगारी करत असल्याने वानवडी पोलिसांनी या टोळीवर मोक्काखाली कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे पाठविला होता.अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी त्याला मान्यता दिली आहे.
वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय पतंगे सहायक निरीक्षक, दिगंबर बिडवे, श्रेणी उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मनोज साळुंखे, अमोल कदम, उत्तरेश्वर धस, चैत्राली यादव यांनी ही कामगिरी केली.
Discussion about this post