Pune News : पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने खालील उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील रेल्वेचे जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी ही माहिती दिली.
पुणे-संबळपूर-पुणे (24 ट्रीप)
गाडी क्रमांक 08328 पुणे-संबळपूर साप्ताहिक विशेष दिनांक 16.4.2024 ते 02.7.2024 दरम्यान (12ट्रिप) दर मंगळवारी पुण्याहून 09.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.30 वाजता संबळपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 08327 संबळपूर -पुणे साप्ताहिक विशेष दिनांक 14.4.2024 ते 30.6.2024 (12 ट्रिप) दरम्यान दर रविवारी संबळपूर येथून 22.00 वाजता सुटेल आणि पुण्याला तिसरे दिवशी 02.45 वाजता पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कंटाबांजी, टिटलागड, बालनगीर आणि बरगढ़ रोड.
रचना: एकूण 22 आयसीएफ कोच:- एक AC-2 टियर, चार AC-3 टियर, 9 स्लीपर क्लास, 8 सामान्य द्वितीय श्रेणी सहित दोन सामान व गार्ड ब्रेक व्हॅन.
हडपसर- गुवाहाटी- हडपसर (16 ट्रिप)
गाडी क्रमांक 05609 हडपसर-गुवाहाटी साप्ताहिक विशेष दिनांक 09.5.2024 ते 27.6.2024 दरम्यान (8 ट्रिप) हडपसर येथून दर गुरुवारी 10.00 वाजता सुटेल आणि गुवाहाटीला तिसरे दिवशी 08.15 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 05610 गुवाहाटी-हडपसर साप्ताहिक विशेष दिनांक 06.5.2024 ते 24.6.2024 दरम्यान (8 ट्रिप) दर सोमवारी गुवाहाटी येथून 20.40 वाजता सुटेल आणि हडपसरला तिसरे दिवशी 18.20 वाजता पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, खगरिया, नवगछिया, कटिहार, आणि न्यू जलपाईगुडी.
रचना: एकूण 18 आयसीएफ कोच:- एक AC-2 टियर, तीन AC-3 टियर, 12 स्लीपर क्लास, 2 सामान व गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण: गाडी क्रमांक 08328 चे बुकिंग दिनांक 13.4.2024 रोजी आणि 05609 साठी बुकिंग दिनांक 14.4.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि या गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.
Discussion about this post