Pune News : पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील दोनशे कैद्यांना दि. १५ मार्च रोजी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी व पाँडेचरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत कार्ड’ व ‘ई-श्रम कार्ड’चे वाटप करण्यात आले. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे उपस्थित होत्या.
राष्ट्रीय स्वास्थ प्राधिकरणाचे ‘आयुष्यमान भारत कार्ड’ व श्रम व रोजगार मंत्रालयाचे ‘ई-श्रम कार्ड’ यांची ऑनलाईन नोंदणी समता फाउंडेशनतर्फे १२ मार्च पासून सुरु करण्यात आली होती. या कार्डचे वाटप १५ मार्च रोजी करण्यात आले.
हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पुणे अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग पुणे स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
Discussion about this post