Pune News : पुणे : नांदेड ,परभणी, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज २१ मार्च रोजी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर या ठिकाणी होता. काही गावांनध्ये घराच्या भीतींना तडे गेल्याची माहिती मिळत आहे. कोठेही प्राणहानी झालेली नाही.
सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ४.२ रिश्तर स्केलचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात २ धक्के जाणवले असून त्यातील एक ३.६ आणि दुसरा ४.५ रिश्तर स्केलचा होता.
Discussion about this post