Pune News : पुणे : मध्य रेल्वे द्वारे नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाड्यांची वारंवारता आठवड्यातून दोन दिवसांवरून तीन दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात सोयीस्कर आणि कार्यक्षम प्रवास पर्यायांची वाढती मागणी नक्की पूर्ण होईल. अशी माहिती रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.
नागपूर ते पुणे सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी क्र. 01165 दिनांक 18.4.2024 ते 13.6.2024 पर्यंत प्रति गुरुवारी आठवड्यातून तीन दिवस धावेल.(एकूण 9 ट्रीप)
पुणे ते नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी क्र. 01166 दिनांक 19.4.2024 ते 14.6.2024 पर्यंत दर शुक्रवारी धावेल. (एकूण 9 ट्रीप).
वरील विशेष गाड्यांचे थांबे, रचना यात कोणताही बदल नाही.
आरक्षण: उन्हाळी विशेष गाडी क्रमांक 01165, 01166 साठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक 13.04.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Discussion about this post