Pune News : पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी व्हावी या हेतूने रेल्वेने पुणे ते दानापूर मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या २ फेर्या होणार आहेत. ही माहिती रेल्वेचे पुणे येथील जनसंपर्काधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.
या गाडीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पुणे-दानापूर-पुणे (2 ट्रिप)
गाडी क्रमांक 01421 पुणे- दानापूर उन्हाळी विशेष दिनांक 17.4.2024 रोजी पुण्याहून 19.55 वाजता सुटेल आणि दानापूरला तिसऱ्या दिवशी 04.30 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01422 दानापूर – पुणे उन्हाळी विशेष दानापूर येथून दिनांक 19.4.2024 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे : दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना : एकूण 22 आयसीएफ कोच: दोन AC-3 टियर, 16 स्लीपर आणि चार द्वितीय सामान्य श्रेणी सहित दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण : गाडी क्रमांक 01421 साठी बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.com वेबसाइटवर सुरू आहे.
विशेष गाड्यांच्या तपशीलवार थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Discussion about this post