Pune News : पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने पुणे ते मुझफ्फरपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुटणार्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
गाडी क्रमांक 05290 पुणे- मुझफ्फरपूर सुपरफास्ट एसी विशेष दिनांक 29.4.2024 ते 01.7.2024 दरम्यान (10 ट्रीप) दर सोमवारी पुण्याहून 06.30 वाजता सुटेल आणि मुझफ्फरपूरला दुसऱ्या दिवशी 15.15 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 05289 मुझफ्फरपूर – पुणे सुपरफास्ट एसी विशेष दिनांक 27.4.2024 ते 29.6.2024 दरम्यान (10 ट्रीप)दर शनिवारी मुझफ्फरपूर येथून 21.15 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 05.35 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना,प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर.
संरचना: 20 एसी-3 टियर इकॉनॉमी + दोन जनरेटर कार = एकूण 22 एलएचबी कोच
आरक्षण: गाडी क्रमांक 05290 साठी बुकिंग दिनांक 25.4.2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या थांबण्याच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiryindianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Discussion about this post