Pune News : पुणे : येरवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा करून दोन वर्षांपासून फरारी असणार्या एका आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.
अनिकेत ऊर्फ उर्या आकाश उरणकर (वय २५, रा. गंगाधाम चौक, मार्केट यार्ड, पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.
विश्रांतवाडी पोलीसठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी एक खून झाला होता. या प्रकरणातील आरोपी अनिकेत दोनवर्षांपासून फरार होता.येरवडा पोलीसठाण्यातील अंमलदार श्रीनाथ कांबले यांना आरोपी कोरेगाव पार्क परिसरात आल्याची माहिती मिळाली.पोलीसपथकाने तेथे तातडीने जाऊन त्याला ताब्यात घेतले.त्याची चौकशी केली असता त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली ब्दिली. पोलिसांनी त्याला विश्रांतवाडी पोलीसठाण्याच्या ताब्यात दिले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त संजय पाटील, येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील, निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार श्रीनाथ कांबळे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांनी केली.
Discussion about this post