व्हीएसआरएस मराठी न्युज -मावळतालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या 4 ग्रामपंचायतीवर प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे. यात साळुंब्रे, डोणे, आढले आणि उदेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तर पुढील महिन्यात आंबळे, शिळींब आणि लोहगड या तीन ग्रामपंचायतींवर तसेच मे महिन्यात भाजे, मुंढावरे, सांगिसे या तीन ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
आढले ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 3 जानेवारीला संपला, तर साळुंब्रे आणि डोणे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 4 जानेवारी रोजी संपला. त्याठिकाणी गट विस्तार अधिकारी एन. जे. ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर उधेवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 जानेवारी रोजी संपला असून त्याठिकाणी एस. के खांडेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Discussion about this post