व्हीएसआरएस मराठी न्युज –दिनांक 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत या महाशिबिराचा कालावधी असणार आहे, यामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. मावळ तालुक्यातील गरजू व्यक्तींनी या शिबिरात सहभागी होऊन विविध आजारांवरील मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले.
यावेळी आमदार शेळके, प्राचार्य डॉ. स्वाती बेलसरे, कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post