व्हीएसआरएस मराठी न्युज –आयपीएलचा फायनल सामना चेन्नईविरुद्ध गुजरात यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 ओव्हरमध्ये 214 धावा केल्या. सीएसकेची फलंदाजी सुरू होताच पुन्हा अहमदाबादमध्ये पाऊस सुरू झाला.
नंतर कमी केलेल्या 5 ओव्हर दिलेले 171 रणचे आव्हान पुर्ण करत चेन्नईने गुजरातचै 5 विकेटने पराभव करत विजय नोंदवला. या विजयाने चेन्नई पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे.
आयपीएल 2023 ची अंतिम फेरी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लढत दिली. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने पहिल्या गेममध्ये 4 गडी गमावून 214 धावा केल्या होत्या. मुसळधार पावसामुळे मोदी स्टेडियम जलमय झाले होते. आणि सामना थांबवावा लागला. त्यानंतर फायनल जिंकण्यासाठी चेन्नईने 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातला प्रत्युत्तर देताना चेन्नईने 15 षटकात 5 गडी गमावून 171 धावा केल्या आणि आयपीएल फायनल जिंकली.
चाहत्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे मी भारावून गेलो आहे. त्यामुळेच पुढच्या हंगामात मी येऊन खेळणं हे चाहत्यांना माझ्याकडून गिफ्ट असेल”, असं सांगत महेंद्रसिंग धोनीने मी पुन्हा येईन हे स्पष्ट केलं आहे.
Discussion about this post