व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -इंदिरानगर फ्रेंड सर्कल लिगच्या वतीने प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये मोहननगर, चिंचवडस्टेशन,रामनगर, दत्तनगर, महात्मा फुलेनगर आकुर्डी आदी परिसरातील संघांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. अत्यंत अटीतटीचे रोमांचकारी सामने बघायला मिळाले. अनेक खेळाडूंनी आपल्या देदीप्यमान क्रीडा गुणांचा प्रदर्शन केले. या स्पर्धेतील ‘मॅन ऑफ द सिरीज’ साठी सायकल बक्षीस ठेवण्यात आली होती. फायनमधील दोन संघातील एक एक खेळाडूला समान गुण मिळाले म्हणून त्यांना पुन्हा खेळविण्यात आले मात्र पुन्हा त्यांचा दोघांचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे त्यांना पुन्हा खेळावे लागले. आणि मॅन ऑफ द सिरीज स्पर्धेचा निकाल लागला. या स्पर्धेत रामनगर,मोहननगर, दत्तनगर,विद्यानगर,महात्मा फुलेनगर या विभागातील संघ विजेते ठरले. या विजेत्या संघांना युवा नेते निहाल पानसरे,प्रसाद शेट्टी,विशाल यादव,गणेश लंगोटे, गणेश दातीर पाटील, दत्ता देवतरासे,ब्रह्मानंद जाधव व मारुती भापकर यांच्या हस्ते भव्य ट्रॉफी व प्रत्येक खेळाडूला मेडल देण्यात आले.
इंदिरानगरच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर परिश्रम घेतले. अत्यंत निष्पक्ष राहून हे सामने यशस्वी करून दाखवले. पंचांनी योग्य निष्पक्ष निर्णय दिले.
Discussion about this post