व्हीएसआरएस न्युज आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण आज पहिलवान रवि दाहिया सुवर्णपदक, तर भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदकावर नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
यासोबतच आज दीपक पुनिया, विनेश फोगाट यांच्यावरही साऱ्यांच्या नजरा असतील. तसेच आज ज्या सामन्यावर साऱ्या भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत, तो म्हणजे, पुरुषांची फ्री स्टाईन कुस्तीचा 57 किलोग्राम वर्ग.
रवि दाहिया अंतिम सामन्यात रशियाच्या ऑलिम्पिक कमिटीच्या वतीनं यंदा टोकियोत खेळणाऱ्या पहिलवान जावूर उगुएवच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे.
या सामन्यात भारताकडे टोकियो ऑलिम्पिक मध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. रवि दाहिया सध्या फॉर्मात असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशाला सोनीपतच्या नाहरी गावात राहणाऱ्या या पहिलवानाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. हा सामना दुपारी 3 वाजून 45 मिनिटांच्या आसपास सुरु होईल.
पुरुष हॉकी संघासाठी सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या असल्या तरी, 41 वर्षांनी सेमीफायनल्स गाठलेल्या हॉकी संघासाठी कांस्य पदकंही कमी नाही. कांस्य पदकावर नाव कोरण्याच्या आशेसह आता भारतीय पुरुष हॉकी संघ आद जर्मनीशी लढणार आहे. हा सामना सकाळी 7 वाजता सुरु होईल.
संध्याकाळी जवळपास 4 वाजता कुस्तीच्या फ्रीस्टाइल स्पर्धेसाठी 86 किलोग्राम गात दीपक पुनिया कांस्य पदकासाठी मॅटवर उतरणार आहे. यापूर्वी बुधावाी दीपकचा सेमीफायनल्समध्ये पराभव झाला होता. याव्यतिरिक्त आज महिलांच्या 53 किलोग्राम फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये विनेश फोगाट मॅटवर उतरणार आहे. दरम्यान, आज सकाळी 8 वाजता पहिला सामना होणार आहे.
Discussion about this post