व्हीएसआरएस न्युज –
जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला. खडसेंच्या कारचे टायर फुटून जळगावमध्ये हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात खडसे सुखरुप असून गाडीतील कोणालाही दुखापत झालेली नाही.
अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असताना एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला. खडसेंच्या गाडीचे टायर फुटले, मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीवर नियंत्रण मिळवले. खडसेंसह गाडीतील सर्व जण सुखरुप असून कोणालाही इजा झालेली नाही.