व्हीएसआरएस न्युज -चिंचवड
रवींद्रजाधव हे चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. चिंचवड पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत असताना जाधव यांनी दोन गुन्हे बेजबाबदारपणे दाखल केल्याचे म्हटले आहे.
19 ऑक्टोबर 2020 रोजी एका विनयभंगाच्या गुन्ह्यात सकृतदर्शनी पुरावा नसताना देखील गुन्हा दाखल करून त्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी आणखी एक सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून नियमवाहापणे सूर्यास्तनंतर एका महिलेला अटक केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून योग्य पुराव्यानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. तसेच पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणे वरिष्ठ निरीक्षकाचे काम आहे. असे असताना जाधव यांनी बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणा करत दोन गुन्हे दाखल केल्याने 17 नोव्हेंबर पासून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
बेशिस्त, वेजबावदार आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.