व्हीएसआरएस न्युज -मुंबई दि.8नोव्हें
दिवाळीत तुमच्यावर कोणतीही आणीबाणी मी लादणार नाही. दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी नक्की साजरा केला पाहिजे, मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा. फटाक्यांवर बंदी घालायची का? ती जरुर घालता येईल, पण ती मुळीच घालणार नाही. तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत जसं सहकार्य केलं तसंच दिवाळीलाही करा. घरात, इमारतीला रोषणाई करा. दिवे लावा, फटाकेही वाजवा पण मर्यादित स्वरुपात वाजवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीत असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केले. यावेळी दिल्लीत आलेल्या कोरोना लाट लक्षात घेऊन फटाके वाजवून प्रदुषण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. कोरोना लसीचा अजून पत्ता नसल्याने सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवून प्रदूषण करू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.