व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पर्यावरणाचे रक्षण….हेच आपले संरक्षण… या उक्तीप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर व पार्थ पवार फांउडेशनच्या वतीने दापोडी येथे कोरोनाच्या काळात देशातील ऑक्सिजनचा होणारा तुटवडा पाहता नागरिकांना आरोग्य कर्मचार्यांच्या हस्ते झाडे वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी झाडेवाटप करताना आम्ही स्वच्छतेची खबरदारी घेतो. तुम्ही एक झाड लावून ऑक्सिजन वाढविण्याची जबाबदारी घ्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
आयोजक नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, स्विकृत नगरसेवक •संजय कणसे, अजय जाधव, आरोग्य अधिकारी सुनिल चव्हाण, पाणीपुरवठा कर्मचारी श्री. दारवटकर, उद्यान अधिकारी पटेल साहेब, आनंद कांबळे आरोग्य कर्मचारी संदिप राठोड, रवि शिंदे, दत्ता कांबळे, सुनिंदर पवार, राजू वालिक, यादव वाघमारे, जाफर, शेख, नरेश सुतार उपस्थित होते.