व्हीएसआरएस न्युज पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती.
शैक्षणिक अहर्ता, अनुभव कालावधी, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अहर्ता, मत्ता व दायित्व आणि शिस्तभंग विषयक कारवाई इत्यादी सेवाविषयक तपशील पडताळून ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्यास समितीने मान्यता दिली.
महापालिकेत सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाची निर्मिती झाली आहे.
महापालिका कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने हे पद रिक्त ठेवणे योग्य नाही. यासाठी महापालिकेच्या पदोन्नती समितीची 5 मार्च 2021 रोजी बैठक झाली.
याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी काढले आहेत.