व्हीएसआरएस न्युज -पिपंरी-चिंचवड पिंपरी चिंचवड रुग्णालयातील मानधन कर्मचारी यांना सुधारीत किमान वेतन व कोविड भत्ता लागू करावा,अशी मागणी उपमहापौर केशव घोळवे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका रुग्णालयातील/दवाखानेमध्ये कार्यरत असलेले फिजीओथेरचिस्ट, स्टाफनर्स, ए,एन.एम. फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशन, ई सी जी टेक्निशन, मदतनीस,सफाई कामगार, स फाई सेवक इत्यादी मानधन कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच मनपा यशवंतराव स्मृती रुग्णालय मधील मानधन कर्मचारी प्रमाणे वेतन अदा करणेबाबत मा. स्थायी समिती ठराव क्रमांक ७४४६ दिनांक ९/९/२०२०, विषय क्रमांक ३२ अन्वये मान्य झालेला आहे.तसेच वैद्यकिय विभागामार्फत अद्यापही सदर ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही.
पिंपरी चिंचवड शहरात कोविड-19 या प्रादुर्भाव रोगाचा प्रसार झालेला होता. तरी सुध्दा मानधन कर्मचारी यांनी शहराची सेवा करताना स्वत:ची व परीवाराची कोणतीही पर्वा न करता सेवा केलेली आहे. यशवंतराव स्मृती रुग्णालयमधील कर्मचारी यांना देण्यात येत असलेले वेतन/मानधन तसेच इतर रुग्णालय, दवाखाने मधील मानधन कर्मचारी यांना देण्यात येत असलेल्या वेतन/मानधनमध्ये तफावत दिसून येत आहे. इतर रुग्णालयातील मानधनवरील कर्मचा-यांना कमी मानधन अदा करण्यात येत असल्याने सदरच्या मानधन कर्मचारी यांच्यावर अन्याय होत आहे.
तरी सदर मानधन कर्मचारी यांना कुशल, अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार दिनांक १/१/२०२० पासून सुधारीत किमान वेतन व माहे जून २०२० पासून कोविड भत्ता लागू करण्यात यावा या बाबत आयुक्त निवेदन दिले.