व्हीएसआरएस न्युज
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली आमदार शेळके यांनी नगरपरिषदेच्या हद्दीत सुरु असलेली व प्रलंबित विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करुन बैठकीत आढावा घेतला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अंतर्गत अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. विकासकामांना मंजुरी मिळूनही काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. रस्त्याची कामे रखडली आहेत. मुख्य बाजारपेठ भागात भविष्यातील विचार करत भुमिगत विद्युतवाहिनी टाकण्याची गरज आहे. तळेगाव-चाकण रस्त्याचा रुंदीकरणाचा विचार करता तेथील वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे नियोजन केले पाहिजे. अशा सूचना या वेळी आमदार सुनील शेळके यांनी केली.
बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी साताधार्याच्या कामा बाबत नाराजी व्यक्त करीत सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. असे सांगत जनतेसमोर अनेक समस्या असताना नगरपरिषद प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. स्वच्छ पाणीपुरवठा, चांगले रस्ते, कचरामुक्त शहर यांसारख्या मुलभूत आवश्यक बाबी पुरविण्यास नगरपरिषद असमर्थ ठरत आहे. नागरिकांना वेठीस धरून विकासकामात राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पुर्णपणे चुकीचे असुन सर्वसामान्य जनतेचा एकही पैसा चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही.असे सांगितले
नगरपरिषदेची भव्य व अद्ययावत प्रशासकीय इमारत होणार असून यासाठी राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून नगरपरिषद मुख्य इमारतीच्या निधीस प्रशासकीय मान्यता चार महिन्यापूर्वी मिळालेली आहे. परंतु अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने तांत्रिक मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यास नगरपरिषदेकडून दिरंगाई झाल्याचे या बैठकीत निदर्शनास आले असल्या चे हि या वेळी
सांगण्यात आले.
राज्य शासनाकडे विकासकामांचे प्रस्ताव पाठवायचे
असल्यास 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, त्या
विकासकामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा व निधी आणण्याची जबाबदारी माझी राहील, असे आमदार सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस आमदार सुनिल शेळके, उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, मुख्याधिकारी दिपक झिंजाड, नगरसेवक गणेश काकडे, संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका हेमलताताई खळदे, संगिताकाकी शेळके, मंगलताई भेगडे, सर्व अधिकारी व पत्रकार बंधु उपस्थित होते.