व्हीएसआरएस न्युज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथे बारा वर्षांपूर्वी 138 प्रकारचे 450 वनस्पती लावण्यात आले आहेत ही जमीन एमआयडीसीने विकली आहे, मानवा साठी उपयुक्त असणारी झाडे मानवच तोडण्याचा प्रयत्न करीत आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे ही झाडे वाचविण्यासाठी वाटेल ते करू असे अभिनेते सयाजी शिंदे यांनी पिंपरी येथे सांगितले
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भोसरी एमआयडीसी मधील औषधे उद्यान वाचविण्यासाठी वृक्षप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला असून निमा संघटना आणि नाम फाऊंडेशनच्या पदाधिकारी समवेत मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली एमआयडीसीने खाजगी विकासकास दिलेला भूखंड रद्द करावा अशी मागणी यावेळी सयाजी शिंदे यांनी केली;
निमा संघटनेसाठी दिलेला भूखंड ज्यावर शेकडो वृक्ष लावलेली आहेत तो भूखंड महापालिकेचा असताना एमआयडीसीने परस्पर विक्री केलेला आहे तो भूखंड परत निमा संघटनेला मिळावा यासाठी सयाजी शिंदे यांनी आयुक्तांशी चर्चा केली.
यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजित पाटील डॉक्टर अभय तांबिले, नाम फाऊंडेशनचे अमित गोरखे ,सिटीझन फोरमचे धनंजय तुषार शिंदे, नगरसेविका अनुराधा गोरखे आदी मान्यवर उपस्थित होते.