व्हीएसआरएस न्युज
पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
शहराच्या विविध भागातील 172 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद.आज दाखल संशयित रूग्ण २१२८ आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण २०६७
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – चिंचवड (७० वर्षे, ४६ वर्षे), प्राधिकरण (६४ वर्षे) ०२ स्त्री – पिंपळे चिंचवड (५४वर्षे), पिंपरी (५९ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयामध्ये मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री – पिंपळवंडी (७० वर्षे), न-हे आंबेगाव खुर्द (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
शहरात आजपर्यंत 89 हजार 283 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 275 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1558 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 642अशा 2200जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या 1450 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1042 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 89 हजार 283झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.